या झाडासाठी खर्च केले जातात 15 लाख रुपये, चोवीस तास असतो कडक पहारा

🌲या झाडासाठी खर्च केले जातात 15 लाख रुपये, चोवीस तास असतो कडक पहारा🌲

-----------------------------------------
❍ माहिती सेवा ग्रूप पेठवडगांव ❍     
----------------------------------------                             
          ❍ दिनांक - १८ ऑगस्ट २०२०
----------------------------------------
देशाच्या सीमेवर मोठ्या प्रमाणात सैनिक तैनात असतात आणि ते सीमेवर पहारा देत देशाची दिवसरात्र सुरक्षा करतात. फक्त देशच नाही तर व्हीआयपी मंडळींसाठी म्हणजेच अतिविशेष व्यक्तींसाठी 24 तास सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षक तैनात असतात. पण हिंदुस्थानात एक असे झाड आहे त्याला फक्त VIP नव्हे तर VVIP ट्रीटमेंट दिली जाते. या झाडाभोवती 24 तास पोलिसांचा पहारा असतो. इतकेच नाही तर या झाडाच्या देखभालीसाठी वर्षाकाठी 12 ते 15 लाख रुपये खर्च केला जातो.
मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ आणि विदीशा दरम्यान सलामतपूरमध्ये एक झाड आहे. या झाडावर राज्य सरकार 12 ते 15 लाख रुपये खर्च करते अशी माहिती मिळाली आहे. इतकेच नाही तर या झाडाच्या सुरक्षेसाठी 24 तास पोलीस तैनात असतात. या झाडाच्या संरक्षणासाठी भोवताली 15 फूट जाळी लावण्यात आली आहे.
----------------------------------------
https://www.facebook.com/MAHITIseva/   *❍ फेसबुक पेज अवश्य लाइक करा ❍*
----------------------------------------
या झाडाला पाणी देण्यासाठी स्थानिक नगरपालिकेकडून एका पाण्याच्या टॅंकरची व्यवस्था करण्यात आली आहे. या झाडाला कुठलीही रोगराई किंवा कीड लागू नये म्हणून कृषी अधिकारी दर आठवड्याला एक दौरा करतात. या झाडाची संपूर्ण देखभाल जिल्हाधिकारी करतात. या झाडाचे दर्शन घेण्यासाठी पर्यटकांसाठी एक पक्का रस्ताही शासनाने बनवला आहे.
आता वाचकांना प्रश्न पडला असेल की एका झाडाची एवढी काळजी का घेतली जाते? एका झाडाला एवढी VVIP ट्रीटमेंट कशासाठी? तर हे झाड श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती महिंद्रा राजपक्षे यांनी लावले होते.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठ वडगावची पोस्ट हे झाड साधेसुधे नसून गौतम बुध्दांना ज्या झाडाखाली मोक्ष प्राप्त झाली होते, त्या झाडाची फांदी रोवण्यात आली होती. या फांदीचे रुपांतर आता वृक्षामध्ये होऊ लागले आहे. हे झाड म्हणजे गौतम बुद्धाच्या अस्तित्वाचे प्रतीक मानले जात असल्याने या झाडाची इतकी काळजी घेतली जाते.
झाडाला कीड लागल्यानंतर माणसासारखी काळजी घेतली गेली
फेब्रुवारी महिन्यात हे झाड आजारी पडलं होतं, म्हणजेच त्याच्यावर रोग पडला होता. वातावरणातील बदल आणि किड्यांमुळे झाडाची पाने काळी पडायला लागली होती आणि त्यांना भोकेही पडायला लागली होती. झाड आजारी पडल्याने चिंतेचं वातावरण पसरलं होतं. तत्काळ तज्ज्ञांना बोलावण्यात आलं आणि झाडावर इलाज सुरू करण्यात आले. माणसाला ज्या पद्धतीने इंजेक्शन आणि सलाईन लावली जाते, त्याच पद्धतीने झाडाला इंजेक्शन देण्यात आली आणि सलाईनही लावण्यात आली.
हे झाड 8 वर्षांपूर्वी लावण्यात आलेलं आहे. राजपक्षे यांनी 21 सप्टेंबर 2012 रोजी हे रोपटे लावले होते. भूतानचे तत्कालीन पंतप्रधान जिग्मी योजर थिंगले हे देखील यावेळी उपस्थित होते. हे छाटेसे रोपटे आता डेरेदार वृक्षात बदलायला सुरूवात झाली असून हे झाड आता 20 फूट उंच झाले आहे.
✺ 𝑾𝒉𝒂𝒕𝒔𝒂𝒑𝒑  9011714634  𝐕𝐢𝐤𝐢 ✺
                  *_❍ माहिती सेवा ग्रूप ❍
❍ पेठवडगांव,जि. कोल्हापुर ❍
----------------------------------------
Vikram dhanawade

माहिती सेवा ग्रूप (भादोले) हा ब्लॉग मी माहितीची देवाणघेवाण व्हावी यासाठी सुरू केला या ब्लॉग वर आपणास फक्त माहिती वाचावयास मिळेल.यासाठी कोणताही विषय वर्ज्य नाही. -विक्रम धनवडे

*

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने