मुख्यपृष्ठयोजना पुढची 25 वर्ष एक रुपयाही येणार नाही वीज बिल, सरकारची ही स्कीम आजच घ्या! byVikram dhanawade •जुलै ०९, २०२२ 0 पुढची 25 वर्ष एक रुपयाही येणार नाही वीज बिल, सरकारची ही स्कीम आजच घ्या!सातत्याने वाढणाऱ्या वीजबिलामुळे (Electricity Bill) सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. एकीकडे वाढत्या महागाईमुळे (Inflation) आर्थिक नियोजन कोलमडलेलं असताना, दुसरीकडे वाढत्या वीजबिलांमुळे नागरिकांना झटका बसत आहे. त्यात वीज भारनियमनाची समस्याही आहे. या सर्व गोष्टींवर सौर ऊर्जा (Solar Energy) हा उत्तम पर्याय ठरताना दिसत आहे. सौर पॅनेलच्या (Solar Panel) माध्यमातून वीजनिर्मिती करून अनेक नागरिक विजेची गरज भागवत आहेत. येत्या काळात हा पर्याय विस्तारत जाणार आहे. कारण सरकार वीजनिर्मितीसाठी सौर ऊर्जेला प्रोत्साहन देत आहे. भारत सरकार ऊर्जेच्या पारंपरिक स्रोतांऐवजी पर्यायी स्रोतांवर जास्त भर देत आहे. सरकारने 2030पर्यंत 40 टक्के वीज अपारंपरिक पद्धतीने निर्माण करण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे. अशा स्थितीत घराच्या छतावर सोलर पॅनेल लावून वीजनिर्मितीसाठी नागरिकांना प्रोत्साहन दिलं जात आहे. ही यंत्रणा बसवण्यासाठी सरकारकडून अनुदान (Subsidy) देण्यात येत आहे. यातून विजेची गरज भागवणं आणि शिल्लक विजेची विक्री करून उत्पन्न मिळवणं, अशा दोन्ही गोष्टी नागरिकांना साध्य होणार आहेत.डिझेल-पेट्रोलचा वापर कमी करून आयातीवरचा खर्च (Import Bill) कमी करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. यामुळे परकीय चलन साठ्याच्या दृष्टीनं देशाला फायदा होईलच; पण पर्यावरण संरक्षणाचा हेतू साध्य होण्यास हातभार लागेल. या गोष्टींचा विचार करून, सरकारने 2030 पर्यंत 40 टक्के विजेचं उत्पादन अपारंपरिक पद्धतीनं करण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे. 2030 पर्यंत सौर ऊर्जेच्या माध्यमातून 100 गिगावॅट वीज उत्पादन करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. त्यापैकी काही विजेचं उत्पादन घरांच्या छतांवर सोलर पॅनेल्स बसवून करण्याचं नियोजन आहे. त्यासाठी सरकारकडून अनुदान दिलं जात आहे.सर्वसामान्यपणे एका घरासाठी 2 ते 4 KW क्षमतेची सोलर पॅनेल्स पुरेशी ठरतात. त्यावर एक एसी, 2-4 पंखे, एक फ्रीज, 6 ते 8 एलईडी लाइट्स, पाण्याची 1 मोटार आणि टीव्ही यांसारखी उपकरणं सहज वापरता येतात. समजा तुम्ही उत्तर प्रदेशात राहत असून, तुमच्या घराचं छत 1000 चौरस फूट आकाराचं आहे. या छताच्या निम्म्या अर्थात 500 चौरस फूट जागेवर सोलर पॅनेल्स बसवली तर त्या प्रकल्पाची क्षमता 4.6KW असेल. यासाठी एकूण खर्च 1.88 लाख रुपये येईल. अनुदानानंतर खर्चाचा आकडा 1.26 लाख रुपये होईल. घरातली विजेची गरज या सोलर पॅनेल्सच्या माध्यमातून पूर्ण होईल. दर महिन्याला येणारं सुनारे 4232 रुपयांचं विजेचं बिल वाचेल. वर्षभराचा हिशोब केला तर 50,784 रुपयांची बचत होईल. म्हणजेच अडीच वर्षांत संपूर्ण खर्च वसूल होईल. 25 वर्षांत एकूण बचत सुमारे 12.70 लाख रुपये असेल.गरज कमी असेल, तर कमी क्षमतेची पॅनेल्स बसवता येतात. 2kW ची सोलर पॅनेल्स बसवली, तर 1.20 लाख रुपये खर्च येईल. 3 किलोवॅटपर्यंतची सोलर रूफटॉप पॅनेल्स (Solar Rooftop Panel) बसवण्यासाठी सरकारकडून 40 टक्क्यांपर्यंत अनुदान दिलं जातं. सरकारकडून यासाठी 48,000 रुपये अनुदान मिळेल. त्यामुळे खर्च कमी होऊन 72 हजारांवर येईल. सोलर रूफटॉफ पॅनेल्स लावण्यासाठी https://solarrooftop.gov.in/ या अधिकृत वेबसाइटवर अर्ज करावा लागेल.ही योजना नागरिकांसाठी अनेक अर्थांनी फायदेशीर आहे. याअंतर्गत सोलर पॅनेल्स बसवण्यासाठी खर्च कमी येतो. कारण सरकार अनुदानाच्या माध्यमातून मदत देतं. केंद्र सरकारशिवाय अनेक राज्यांची सरकारंही यासाठी अतिरिक्त अनुदान देतात. दुसरा फायदा म्हणजे, सोलर पॅनेल्स लावल्यानंतर वीजबिलाचा भार संपुष्टात येतो किंवा कमी होतो. घरासाठी आवश्यक वीज छतावर सोलर पॅनेल्सच्या माध्यमातून तयार होते. तिसरा फायदा म्हणजे, या योजनतून उत्पन्नाची संधीदेखील मिळू शकते. सोलर पॅनेल्समधून गरजेपेक्षा जास्त वीजनिर्मिती होत असेल, तर वीज वितरण कंपनी (Electricity Distribution Company) ही वीज खरेदी करते. त्यामुळे ग्राहकांना पैसे मिळतात आणि आर्थिक फायदा होतो. Tags: योजना Facebook Twitter