ज्या ‘हिजाब’वरून कर्नाटकमध्ये वादळ उठलंय तो नेमका असतो तरी काय?

ज्या ‘हिजाब’वरून कर्नाटकमध्ये वादळ उठलंय तो नेमका असतो तरी काय?



आपण कसं रहातो ? कोणते वस्त्र परिधान करतो? हे आपल्या संस्कृतीचं प्रतीक मानलं जातं. ‘साडी’ हे जसं भारतीय स्त्रीचं प्रतीक मानलं जातं, तसं ‘किमोनो’ हे जपानच्या स्त्रीचं प्रतीक आहे, ज्यू लोकांचं ‘सिनागॉग’.. असे विविध पोशाख हे त्या देशाची आता जणू ओळख झाली आहे.
जसा देश बदलल्यावर वेष बदलतो तसं प्रत्येक धर्माची सुद्धा वेशभूषा करण्याची आपली एक व्याख्या आहे. भगव्या रंगाचं वस्त्र हे जसं हिंदू धर्माचं प्रतीक मानलं जातं, तसं बुरखा दिसला, की ती स्त्री मुस्लिम असेल हे आपल्याला कळतं.

या पोशाखात मधल्या काळात ‘हिजाब’ या वस्त्राची भर पडली आहे. नुकतंच कर्नाटकमधील काही शाळांमध्ये हिजाब परिधान करणाऱ्या मुलींना शाळेत वेगळं बसवण्याची घटना घडली. काय होती ही घटना? आणि हिजाबचं महत्व काय आहे? हे जाणून घेऊयात.

‘हिजाब’ म्हणजे काय आहे?

पंजाबी ड्रेसवर जशी ओढणी किंवा स्टोल असतो तसं ‘हिजाब’ हे एक कापड आहे जे की सहसा बुरख्याच्या रंगाचं असतं आणि मुस्लिम स्त्रिया हे आपल्या डोक्यावरून, केसांवरून आणि मानेवरून गुंडाळून घेत असतात.

प्रत्येक मुस्लिम स्त्रीसाठी हिजाब ही आवडती गोष्ट आहे. मुस्लिम धर्मातील स्त्रियांना हिजाब हे अदब आणि सुरक्षित असल्याची भावना निर्माण करत असते.

हिजाब परिधान करण्याची सुरुवात ही प्रामुख्याने इराण आणि इंडोनेशिया या देशांमधून झाली. या दोन्ही देशांमध्ये प्रत्येक मुस्लिम स्त्रीला हिजाब परिधान करणे हे कायद्याने बंधनकारक आहे.

जगातील इतर देशांमध्ये जिथे हिजाब प्रचलित आहे तिथे तो धर्म, संस्कृतीचं प्रतीक मानलं जातं. किशोरवयीन मुलींनी हिजाब परिधान करावा अशी काही देशांमध्ये मान्यता आहे.

हिजाब परिधान करण्याची सुरुवात कधी झाली?

इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर हे आपल्या पत्नीला हिजाब परिधान करण्यास सांगायचे अशी एक आख्यायिका सांगितली जाते. मुस्लिम स्त्रियांनी इतरांपेक्षा वेगळं दिसावं, ओळखू यावं यासाठी त्यांनी हे प्रयोजन केलं होतं.

आपल्या संस्कृतीचा अभिमान म्हणून कालांतराने हिजाब प्रचलित होत गेला. पण, सर्वच स्त्रियांनी त्याला मान्यता दिली असं झालं नव्हतं. पारंपरिक सण, समारंभ प्रसंगी हिजाब परिधान करणे याचा अवलंब मुस्लिम स्त्रियांनी नंतर सुरू केला होता.
हिजाब नियमितपणे परिधान करणाऱ्या प्रसिद्ध व्यक्तींमध्ये २००४ चा शांततेचा नोबेल पुरस्कार मिळणाऱ्या ‘मलाला युसूफ’ आणि मनोरंजन क्षेत्रातील ‘नादीया हुसेन’ यांचा समावेश होतो.

‘हिजाब’ला विरोध का होत असावा?

कर्नाटकमधील उडपी या शहरात मध्यंतरी काही विद्यार्थिनींना हिजाब परिधान करून आल्याने महाविद्यालयात प्रवेश नाकारण्यात आला. संबंधित विरोधकांनी त्याचं हे कारण सांगितलं आहे, की हिजाबमुळे असमानतेची भावना दिसून येते.

शाळेत, महाविद्यालयात शिकण्यासाठी येणारी प्रत्येक मुलगी किंवा मुलगा हे शिक्षकांसाठी समान असतात. हा विचार कर्नाटकमधील इतर महाविद्यालयांना सुद्धा पटला आणि त्यांनी देखील हिजाबला विरोध करण्यास सुरुवात केली. सोशल मीडियावर ही घटना वाऱ्याच्या वेगाने पोहोचली आणि ट्विटरवर “हिजाब इज अवर राईट” असं एक हॅशटॅग समर्थकांनी सुरू केलं.

हिजाबवर जेव्हा विविध प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या तेव्हा हे लक्षात येऊ लागलं, की समाजातील बहुतांश लोकांना मुस्लिम धर्मात परिधान केल्या जाणाऱ्या वेशभूषा जसं, की हिजाब, निकाब आणि बुरखा यातील फरक हा समजत नाही.
निकाब हा केवळ चेहरा आणि डोकं झाकण्यासाठी आणि डोळ्यांपुरती जागा उघडी ठेवण्यासाठी वापरला जातो. त्याव्यतिरिक्त, चदोर हे इराणी मुस्लिम स्त्रिया वापरत असतात.

कर्नाटक राज्यात झालेला हा वाद तिथपर्यंत मर्यादित न रहाता केरळमध्ये सुद्धा काही दिवसांपूर्वी पोहोचला होता. एका मुस्लिम विद्यार्थिनीने हिजाब परिधान करण्याची परवानगी मिळावी यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली होती.
केरळ सरकारने याबद्दल प्रतिक्रिया देतांना हे स्पष्ट केलं होतं की, “अशी परवानगी दिल्यास तो राज्याच्या एकसंघतेला परिणाम करेल आणि धार्मिक मतभेद करून तेढ सुद्धा निर्माण करू शकेल. शाळा, महाविद्यालय सारख्या ठिकाणी तरी विद्यार्थ्यांनी समान दिसावं आणि सर्वांना समान वागणूक द्यावी.”

“आपल्या धर्माचं वेगळेपण हे वेशभूषेपेक्षा विचार आणि आचरणाने दाखवल्यास ते समाजोपयोगी असेल” अशी प्रतिक्रिया सामान्य नागरिक सध्या ‘हिजाब’च्या वादावर देत आहेत.
Vikram dhanawade

माहिती सेवा ग्रूप (भादोले) हा ब्लॉग मी माहितीची देवाणघेवाण व्हावी यासाठी सुरू केला या ब्लॉग वर आपणास फक्त माहिती वाचावयास मिळेल.यासाठी कोणताही विषय वर्ज्य नाही. -विक्रम धनवडे

*

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने